मसाला डोसा कसा बनवायचा:
Masala Dosa : मसाला डोसा हा सर्वाना खूप आवडतो लहान मुलांना तर डोसा हा खूपच आवडत असतो तसाच मसाला डोसा मोठयाला पण खूप आवडत असतो डोसा हा दक्षिण भारतात खुप आवडीने खातात डोसा हा पदार्थ तांदुळ व उडीद डाळ या पासून बनतो यांच्या सोबत बटाटाचा मसाला ,आणि नारळाची चटणी व सांबर सोबत खातात हें खाण्या साठी जितकं आवडतं ते बनवण्या साठी सुद्धा सोप आहें तुमी ही बनवून बगा हया पद्धतीने मसाला डोसा.
मसाला डोसा बनवण्या साठी लागणारे सहितंय :
- ३ कप तांदूळ
- १ कप पांढरी उडीद डाळ
- चवी प्रमाने मीठ २ चमचा तेल
- २ चमचा ते
बटाटाचा मसाला बनवण्या साठी लागणारे सहितय :
- २ बटाटे मदयंम आकाराचे
- १ कांदा मदयंम आकाराचे
- २ हिरवी मिरची
- अर्धा चमच हळदी पावडर
- पाव चमचा मोहरी
- पाव चमचा जिरं
- ४ ते ५ कडीपत्ता
- चवी प्रमाणे मीठ
- २ चमचा तेल
- हिरवी कोथींबीर एक कप
डोसा बनविण्याची विधी :
सगळयात अगोदर एका भांड्यात तांदुळ आणि पांढरी उडदाची डाळ पाण्याने धुवून घावी व तया मदये पाणी टाकून त्याला सकाळी भिजत ठेवावे .
राती भिजत ठेवलैले डाळ व तांदूळ मिक्सर च्या भांडत वाटून घावी एक दम बारीक वाटून झालेले मिश्रण त्यामधये चवी प्रमाणाचे मीठ घालून मिश्रण मिक्स करावे . व रात्र भर मुरू दयावे.
सकाळी डोसा पीठ तयार झाले असेल आता डोसा तवा घाय्वा डोसा तवा गरम झाल्यावर तव्वयांवर थोडे से तेल तव्याचा चारी बाजूनी टाकावे व मग एक चमच्या ने तयार डोसा पीठ तव्वयांवर टाकावे व चमचा ने गोल फिरवावे व पातळ करावे गॅस मंद आचेवर ठेवावं ५ मिनिटे चांगला सोनारी होई पर्यंत शेकावे.
व आपला डोसा बनून तयार आहे .
बटाटाचा मसाला बनविण्याची विधी :
Aloo masala : सर्वात अगोदर कुकर मध्ये बटाटये टाकावे व २ शिट्टया होई पर्यंत बटाटा शिजवावा . बटाटे शिजले कि त्या वरचे साल कडून टाकावे व बटाटाचे छोटे छोटे तुकडे करावे मग कांदा आणि हिरवी मिरची बारीक कापून घावी कोथींबीर सुद्धा कापून घावी मग एका कढाईत तेल गरम करावे गरम तेलात मोहरी ,जिरा आणि कढीपत्ता टाकावा मोहरी जिरा फुल्ले कि मग बारीक चिरलेला कांदा आणि मिरची टाकावी कांदा जरा लाल झाला कि त्या मध्ये हळद पावडर टाकावी व कांद्या मध्ये मिक्स करावे मग कापून घेतलेला बटाटा घालावा मग मिश्रण एक जीव करून घावें मग वरून कापलेली कोथींबीर घालावी आणि चवी प्रमाणे मीठ घालून मिश्रण एक जीव करावे आपला हा बटाटाच्या मसाला बनवून तयार आहे .
सांबार बनवण्याची विधी :
- सांबार बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
- १ कप दुधी भोपळा
- १ कप तूर डाळ
- १ कांदा
- १ टमाट
- १ कप हिरवी कोथींबीर
- १ कप हिरवा पुदिना
- अर्धा चमचा हळद पावडर
- अर्धा चमचा मिरची पावडर
- १ चमचा सांबार मसाला
- अर्धा चमचा धणे पावडर
- २ चमचा तेल
- चवी प्रमाणे मीठ
- अर्धा कप चींचे च पाणी
- अर्धा चमचा अदरख लसूण पेस्ट
- अर्धा चमचा मोहरी
- अर्धा चमचा जिरा
- कढीपत्ता ची पान ५ ते ७
हे पण वाचा : चिकन बिरयानी रेसिपी – Chicken Biryani Recipe In Hindi
सर्वात अगोदर कुकर घावा कुकर मध्ये तूर डाळ बारीक कापलेला दुधी भोपळा ,कांदा ,टोमॅटो लांब लांब बारीक कापलेले हळद ,चवी प्रमाने मीठ आणि दोन ग्लास पाणी घालून ४ ते ५ शिट्टया दाव्या .
कुकर थंड झाल्लयावर एक कढाईत २ चमचा तेल गरम करावे तेलात जिरा ,मोहरी फुलाय्वर कढीपत्ता टाकावा व मग अर्धा चमचा आदरख लसूण पेस्ट घालावी आदरख लसूण पेस्टलाल झाल्या वर मग लाल मिरची पावडर ,धने पावडर ,सांबार मसाला घालावा मग कुकर मधले शिजलेला डाळ आणि भोपळा बारीक करावा आणि मसाला मध्ये टाकावे व सर्व मिश्रण एक जीव करावे मग चिंचचे पाणी आणि कोथींबीर पुदिना घालावे . मग मिश्रण एक जीव करावे उकळी अलाय्वर गॅस बंद करावा . आपलं सांबार बनून तयार आहे .
नारळाची चटणी :
नारळाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
- नारळ एक कप
- शेगदाना अर्धा कप
- डालवा अर्धा कप
- पुदीना १ कप
- मोहरी अर्धा चमचा
- लसूण ४ ते ५ पाकळ्या
- चवी नुसार मीठ
- कढीपत्ता पान ५ ते ७
सर्वात अगोदर नारळाचे छोटे छोटे तुकडे करावे . मिक्सर च्या भांड्यात नारळाचे तुकडे टाकावे मग लसूण पाकळ्या ,शेंगदाणे ,डालवा पुदिनाची पान ,घालून वाटून घावी एक दम बारीक .
मग एक कढाईत तेल गरम करावे तेल गरम झाल्या वर त्या मध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकावा मोहरी फुलल्यावर त्या मध्ये वाटलेले मिश्रण घालावे व चवी पुरते मीठ घालून मिश्रण एक जीव करावे आपली नारळाची चटणी बनून तयार आहे.
हे पण वाचा :
1) चिकन बिरयानी रेसिपी – Chicken Biryani Recipe In Hindi